loader image
[ays_poll id=7]

१८ तोळे बनावट सोने देऊन सोनाराची केली ६ लाखाची फसवणूक

Aug 23, 2022

सोन्याचा मुलामा असलेलं बनावट सोनं खरं भासवत सोनारालाचं फसवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.धरणगाव शहरातील धरणी चौकातील एका सोनाराला बनावट सोनं गहाण ठेवण्याच्या नावाखाली चक्क ६ लाखाला गंडवल्याने सोन्याच्या व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे.धरणी भागात कौस्तुभ सराफ (रा. जळगाव) यांचे रुद्र ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे धर्मेंद्र यादव आणि एक अनोळखी व्यक्तीने काही दिवसांपूर्वी एक-दोन वेळेस सोने तारण ठेवून पैसे घेऊन गेले होते. अशाप्रकारे त्यांनी विश्वास संपादन केला होता मात्र सोन्याचे नव्हे, चांदीचे दागिने देऊन फसवणूक केली आहे.

१९ ऑगस्ट रोजी सराफ यांनी धर्मेंद्र यादवकडून १८ तोळे सोने ६ लाख ९ हजार ५०० रुपयांमध्ये तारण ठेवले. परंतु जळगाव येथे दागिने यांच्या तपासून बघितले असता, त्यावर फक्त काहीअंशी सोन्याचा मुलामा असून, दागिने सोन्याचे नव्हे, तर चांदीचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सराफ यांना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी सराफ यांच्या फिर्यादीवरून धर्मेंद्र यादव व एक अनोळखी व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.