loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला पुणे इंदोर महामार्ग बंद

Nov 29, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदौर पुणे महामार्गावर असलेला रेल्वे ओव्हरब्रिज चा काही भाग आज पहाटे कोसळलाय. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ब्रिटीशकालीन असलेल्या या पुलाचा मध्यभाग ढासळल्याने इंदौर-पुणे हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे . या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदौर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आलीय. मनमाड शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुल कोसळलाय. या पुलाची मुदत संपली असल्यानं त्याचं मागेच स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नव्हती. आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान या पुलाच्या पूर्वेकडील मोठा कठडा कोसळला. यामुळे मातीचा भराव असलेला मोठा भाग सुरक्षा कठड्यासहित कोसळला. यावेळी कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली . मनमाड रेल्वे पोलीस व शहर पोलीसांनी पुलावर बंदोबस्त वाढविला आहे.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.