बॉलिवू़डमध्ये सध्या आलिया, कियारा या तरुण अभिनेत्रींचा जलवा असला तरी, जेव्हा गोष्ट सौंदर्याची येते तेव्हा सर्वांच्या डोळ्यासमोर ऐश्वर्या राय – बच्चन हे एकच नाव येतं. वयाची तिशी पार केलेली ही अभिनेत्री आजही तितकीच सुंदर दिसते जितकी ती विशीत दिसत होती. प्रत्येकाला प्रश्न पडतो की ऐश्वर्या राय – बच्चनच्या सुंदरतेचं नेमकं रहस्य आहे तरी काय? सुंदरता टिकून राहण्यासाठी ऐश्वर्या काही ब्यूटी टिप्सचं नियमित पालन करते.
तिच्या या ब्यूटी टिप्स एकदम पॉकेट फ्रेंडली आहेत. म्हणजे अगदी कुणीही फॉलो करू शकतो असेच हे उपाय आहेत.
तुम्ही जर वयाच्या तिशीमध्ये प्रवेश केला असेल किंवा करणार असाल तर या 4 ब्यूटी टिप्स नक्की फॉलो करा, कारण चाळिशीत प्रवेश करूनही तुम्ही देखील ऐश्वर्या राय – बच्चनसारखं सुंदर आणि तरुण दिसाल हे मात्र नक्की आहे.
भरपूर पाणी पिणे आणि हेल्दी आहार
होममेड मास्क
ऐश्वर्या राय – बच्चन पहिल्यापासूनच DIY मास्कचा वापर करत आली आहे. तिचा आवडता फेस पॅक बेसनाचा आहे. डाळीच्या पिठामध्ये दुधाची साय आणि चिमूटभर हळद मिळसून ती हा पॅक तयार करते आणि लावते. तसंच दूध आणि बदाम तेलापासून देखील ती पॅक बनवून वापरते. स्किन मालिश करण्यासाठी ऐश्वर्या दही आणि मधाचा वापर करते. हे सगळे पॅक आपण देखील घरातील साहित्यापासून बनवून वापरू शकतो.
अरोमा थेरपी
त्वचेचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर ती चिंता, टेन्शन आहे. सततच्या टेन्शनमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकत्या दिसायला लागतात. सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठी ऐश्वर्या अरोमाथेरपी घेती.
यासाठी ती चंदनाच्या तेलाचा वापर करते. अरोमा थेरपीमुळे मानसिक आणि शारीरिक असा दुहेरी फायदा मिळतो. चिंता, स्ट्रेस कमी करण्यास अरोमा थेरमी मदत करते असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
तेल मालिश किंवा तेल चंपी
वाढत्या वयासोबत महिलांना केस गळतीच्या समस्येला देखील तोंड द्यावे लागत असते. ऐश्वर्या देखील तिचे केस मजबूत आणि चमकदार तसेच स्वस्थ ठेवण्यासाठी तेलाने मालिश करून चंपी करते. तेल केसातील फॉलिकल्स आणि क्यूटिकल सेल्स प्रटेक्ट करण्यासाठी मदत करते. तेल चंपीमुळे केसामध्ये कोंडा देखील होत नाही. तसेच यामुळे केसाला चमख येण्यास देखील मदत होते. तसेच ऐश्वर्या तिच्या आहारत देखील अशाच फळांचा, भाज्यांचा समावेश करते ज्यामुळे केस वाढण्यास मदत होते.
या घरगुती चार टिप्समुळे ऐश्वर्या राय – बच्चनाच्या सुंदरता आजही टिकून आहे. आपण देखील तिसच्या उंबरट्यावर असाल तर या टिप्स वापरून आपस्या सौंदर्यात अधिक भर टाकू शकतो.



