Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदेंचे दार्तृत्व ! पुरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण

Sep 12, 2021

नांदगाव शहरात लेंडी नदीला आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळित होऊन अतोनात नुकसान झाले. शासकीय पातळीवर नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरूच असून आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. लेंडी नदी लगत वास्तव्याला असणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलेंडर, शेगडी, रेगुलेटर, लायटर, ५० कीलो तांदूळ, हंडे,स्टीलची भांडी, किराणा सामान, ब्लँकेट, महिलांना २ साड्या, पुरुषांना २ ड्रेस अशी जीवनावश्यक सामुग्री उपलब्ध करून दिली.
मी सदैव जनतेसोबतच- आ. कांदे
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण प्रसंगी आमदारांच्या निवासस्थानी पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.या वेळेस आ.कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी कुटुंबीयांना धिर देत आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत, डगमगु नका अशा शब्दात धिर दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे,विलास आहेर,प्रदीप कासलीवाल, किरण देवरे, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा लवकरच उभारणार : अखिल भारतीय मराठा महासंघाचा पुढाकार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा लवकरच उभारणार : अखिल भारतीय मराठा महासंघाचा पुढाकार

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आकर्षक पुतळा येणाऱ्या...

read more
बाणगांव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी तेज कवडे तर व्हा.चेअरमनदी अभिमान कवडे यांची बिनविरोध निवड

बाणगांव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी तेज कवडे तर व्हा.चेअरमनदी अभिमान कवडे यांची बिनविरोध निवड

नांदगांव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी  बाजारसमितीचे सभापती तेज...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पोषण पंधरवडानिमित्त जनजागृती

मनमाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पोषण पंधरवडानिमित्त जनजागृती

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]