Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदेंचे दार्तृत्व ! पुरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण

Sep 12, 2021

नांदगाव शहरात लेंडी नदीला आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळित होऊन अतोनात नुकसान झाले. शासकीय पातळीवर नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरूच असून आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. लेंडी नदी लगत वास्तव्याला असणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलेंडर, शेगडी, रेगुलेटर, लायटर, ५० कीलो तांदूळ, हंडे,स्टीलची भांडी, किराणा सामान, ब्लँकेट, महिलांना २ साड्या, पुरुषांना २ ड्रेस अशी जीवनावश्यक सामुग्री उपलब्ध करून दिली.
मी सदैव जनतेसोबतच- आ. कांदे
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण प्रसंगी आमदारांच्या निवासस्थानी पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.या वेळेस आ.कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी कुटुंबीयांना धिर देत आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत, डगमगु नका अशा शब्दात धिर दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे,विलास आहेर,प्रदीप कासलीवाल, किरण देवरे, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मालेगावमध्ये राष्ट्रवादीचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला दणका – काँग्रेसच्या महापौरांसह २७ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार !

काँग्रेस चे माजी आमदार रशीद शेख यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेवून आज महापौरांसह काँग्रेस चे २७...

read more

आमदार सुहास कांदे यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तथा कर्मचारी यांच्या सोबत एकत्रित बैठक संपन्न

सातत्याने ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार सुहास...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]