Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदेंचे दार्तृत्व ! पुरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण

Sep 12, 2021

नांदगाव शहरात लेंडी नदीला आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळित होऊन अतोनात नुकसान झाले. शासकीय पातळीवर नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरूच असून आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. लेंडी नदी लगत वास्तव्याला असणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलेंडर, शेगडी, रेगुलेटर, लायटर, ५० कीलो तांदूळ, हंडे,स्टीलची भांडी, किराणा सामान, ब्लँकेट, महिलांना २ साड्या, पुरुषांना २ ड्रेस अशी जीवनावश्यक सामुग्री उपलब्ध करून दिली.
मी सदैव जनतेसोबतच- आ. कांदे
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण प्रसंगी आमदारांच्या निवासस्थानी पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.या वेळेस आ.कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी कुटुंबीयांना धिर देत आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत, डगमगु नका अशा शब्दात धिर दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे,विलास आहेर,प्रदीप कासलीवाल, किरण देवरे, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते,...

read more

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ प्रविण वाजपेयी यांची मनमाड रेल्वे स्टेशन ला भेट !

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ प्रविण वाजपेयी हे मनमाड येथे कार्यकर्त्यांना संबोधित...

read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी मुस्लिम बांधव व शिवसैनिकांतर्फे दुवा पठण!

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून देशासह महाराष्ट्र हा कोविडशी मुकाबला करत आहे. एकीकडे या विषाणूशी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]