नांदगाव तालुक्यात अतीवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतमालाचे झालेले नुकसान सहन न झाल्याने न्यायडोंगरी येथील मंदाबाई भाऊसाहेब काकळीज यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
जळगाव खुर्द, पिंपरखेड, न्यायडोंगरी परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी व काकलीज कुटुंबास सांत्वनपर भेट देण्यासाठी काल कृषिमंत्री ना.दादाजी भुसे नांदगाव येथे आले होते. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी विविध समस्या कृषिमंत्र्यांपुढे मांडल्या.
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
मनमाड : (प्रतिनिधी) नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जनश्रद्धा कार्यालयात...










