नांदगाव तालुक्यात अतीवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतमालाचे झालेले नुकसान सहन न झाल्याने न्यायडोंगरी येथील मंदाबाई भाऊसाहेब काकळीज यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
जळगाव खुर्द, पिंपरखेड, न्यायडोंगरी परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी व काकलीज कुटुंबास सांत्वनपर भेट देण्यासाठी काल कृषिमंत्री ना.दादाजी भुसे नांदगाव येथे आले होते. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी विविध समस्या कृषिमंत्र्यांपुढे मांडल्या.
राशी भविष्य : १४ ऑगस्ट २०२५ – गुरुवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...








