loader image
[ays_poll id=7]

भाजप-संभाजी ब्रिगेडच्या युतीची शक्यता; खेडेकरांनी दिले संकेत!

Sep 16, 2021

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर दोन दिवसात महाविकास आघाडीच्या सरकारची सत्ता या वेगवान अशा घडामोडी घडल्या होत्या. शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात गेल्या दोन वर्षापासून राज्य कारभार चालवला आहे. आता राज्यात आणखी एक राजकीय समीकरण जुळण्याचे संकेत मिळत आहेत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शन पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनी लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं की,’आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला भाजप हासुद्धा एक युतीचा पर्याय असू शकतो.’ या विधानामुळे अर्थातच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर यांनी नेहमीच राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. त्यांच्या भाजपशी युतीबाबतच्या विधानाने खळबळ उडवून दिली आहे. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकामध्ये संपादकीय लेखात भाजपशी युतीबाबतचं विधान केलं आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी म्हटलं की, राजकारणात काँग्रेस-शिवसेना हे कट्टर विरोधक एकत्र येऊ शकतात मग इतरांनी का येऊ नये? संभाजी ब्रिगेडला जर काँग्रेस-राष्ट्रवादी गृहित धरणार असेल आणि फक्त आमच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर करणार असतील तर आम्हालाही तडजोड करून वेगळा पर्याय पाहावा लागेल. किमान समान कार्यक्रमासारखीच भाजपशी युती होऊ शकते असेही भानुसे यांनी सांगितलं.

मराठा सेवा संघ हा आरएसएसच्या विचारधारेचा विरोध करणारा आणि भाजप हा आरएसएसच्या मुशीतून तयार झालेला पक्ष आहे. त्यामुळे दोन्ही विरोधी विचारधारांमध्ये युतीबाबत खेडेकरांनी भाष्य केल्यानं नव्या राजकीय समीकरणाचे हे संकेत आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. खेडेकरांच्या भाजपशी युतीबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा होत आहे. त्या भाजपच्या आमदार होत्या. तेव्हाही पुरुषोत्तम खेडेकर यांनी आरएसएससह भाजपवर टीका केली होती.

अजून बातम्या वाचा..

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपवर...

read more
सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार...

read more
सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच...

read more
बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

अमरावतीत राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या शिबिरातून परतत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या ट्रॅक्‍टरला अपघात...

read more
इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नाती व नांदगाव चे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या...

read more
कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा: महावितरण

कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा: महावितरण

मुंबई/नाशिक, दि.२० फेब्रुवारी २०२३ : मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे...

read more
.