loader image
[ays_poll id=7]

बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात!

Sep 17, 2021


भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रिटेल कर्ज स्वस्त झाले आहे. ही ऑफर होम लोन आणि कार लोन उत्पादनांसाठी लागू असेल. BOB ने गृह आणि कार कर्जाच्या सध्याच्या व्याजदरांवर 0.25 टक्के सूट दिली आहे. याशिवाय बँक गृहकर्जामध्ये प्रक्रिया शुल्काची माफीही देत ​​आहे.

नवे व्याजदर

व्याजदरात कपात केल्यानंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये गृहकर्जाचे दर 6.75 टक्के आणि कार कर्जाचे दर 7 टक्क्यांपासून सुरू होतील. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्जाच्या झटपट मंजुरीसाठी ग्राहक बँकेच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरुन कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच डोअर स्टेप सेवाही उपलब्ध आहे.


अजून बातम्या वाचा..

कोरोना-ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्याची अध्यापकभारतीची मागणी

कोरोना-ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्याची अध्यापकभारतीची मागणी

कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन...

read more
.