loader image
[ays_poll id=7]

‘चंद्रकांत पाटील आमच्या तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असे ऐकले आहे’ – मुख्यमंत्री

Sep 17, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारणात जोरदार उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गुरुवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसात तुम्हाला कळेल’, असे वक्तव्य करत नव्या चर्चेला तोंड फुटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात होते. भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का, यावरही चर्चा सुरू झाली होती. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मिश्किल उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना टोला लगावला.

मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसात तुम्हाला कळेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे असे मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी असे ऐकले आहे की चंद्रकांत पाटील हे आमच्या तीन पक्षांपैकी एका पक्षात येण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही पाटील यांना टोले लगावले आहेत. चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार आहेत, असे माझ्या कानावर आले आहे असे सांगतानाच पाटील यांच्या वक्तव्यानंतर मी त्यांना फोन करून सांगितले की पुढचे २५ ते ३० वर्षे तुम्ही आणखी ‘माजी’च राहणार आहात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले होते?

पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एक खाजगी कार्यक्र होता. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मंचावरुन सूत्रसंचालकाने चंद्रकांत पाटील यांचा दोन-तीनवेळा माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे चंद्रकांत पाटील मागे वळून म्हणाले.

अजून बातम्या वाचा..

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :- भारतीय जीवन विमा निगम,मनमाड कार्यालय मार्फत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनियर...

read more
येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर...

read more
अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा...

read more
कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव रेल्वे स्टेशन वर केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे...

read more
नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
.