Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला पावसाचे दमदार पुनरागमन; नागरिक धास्तावले

Sep 21, 2021

नांदगाव (प्रतिनिधी):- दोन ते तीन दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज दुपारी पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे लेंडी नदीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नांदगावकर पुन्हा एकदा धास्तावले. तसेच रेल्वेचा भुयारी मार्ग पाण्याने भरल्याने नागरिकांचे हाल झाले. लेंडीनदी व शाकंबरीनदीला तेरा दिवसापूर्वी आलेला पूर ओसरत नाही तोच आज पुन्हा नद्या खळखळून वाहू लागल्या. आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारी एक ते दिडच्या दरम्यान नांदगाव शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. शाकंबरी व लेंडी नदीला पुन्हा पाणी वाहू लागल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहर व रेल्वे फाटकाकडिल विवेकानंदनगर, मल्हारवाडी, चांडक प्लॉट, कैलास नगर, हमालवाडा, आनंद नगर, गंगाधरी, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रूग्णालय, कोर्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती आदि लोकवस्तीकडे नागरिकांना ये -जा करण्यासाठी रेल्वेने उभारलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना रेल्वे लाईनवरून जीव धोक्यात घालून जावे लागले. तर नदीकाठी बसलेल्या भाजी विक्रेत्यांची यामुळे एकच उडाली.
नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशा सुचना नांदगाव नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, तहसिलदार, पोलिस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन सतर्क झाले असून पुरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान 8 सप्टेंबरला झालेल्या जलप्रलयातून अजुनही नांदगावकर सावरलेले नसतांना आज पुन्हा लेंडी नदीला जोरदार पाणी वाहू लागल्याने नांदगावकर मात्र आज चांगलेच धास्तावले आहे. दरम्यान, नांदगाव परिसरात यापूर्वी झालेल्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. तर आजच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाने शेतकर्‍यांचा अंत न पाहता त्वरित त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सजनतात्या कवडे यांनी केली आहे.
शहरातील व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर आले असून अधिकार्‍यांनी शहरातील विविध भागात विशेषत: नदीकाठच्या छोट्या- मोठ्या अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांना तीनच दिवसांचा अल्टीमेटम्फ देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
8 सप्टेंबर रोजी नांदगाव शहरातील लेंडी नदी व शाकंबरी नदीला महापूर आला होता. या महापूरात लेंडीनदीवरील फरशीपुलावर असलेल्या टपर्‍या पुराच्या पाण्यात अडकल्याने परिसरातील घरा – घरात पाणी घुसले तर डॉ.आंबेडकर चौक, गांधीचौक व फुले चौक आदी भागातील विविध दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांना निवेदन देऊन निवेदनात भविष्यात पुन्हा असा प्रसंग घडू नये म्हणून त्वरित पावले उचलावित यासाठी मागण्यांचे निवेदन नगरपरिषदेला दिले आहे. नगरपरिषदेने नदीकाठी असलेल्या टपरीधारक व्यवसायिकांना प्रत्यक्ष भेटून व त्यांचे मोबाईल नंबर घेवून त्यांचेशी संवाद साधुन तीन दिवसात आपले अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा नगरपरिषदेकडून काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सदर मोहीम मुख्याधिकारी धांडे यांचे मार्गदर्शनाखाली राहुल कुटे, बंडू कायस्थ, गणेश पाटिल, अरूण निकम, श्रीमती मोरे, धनवटे, चोपडे, आनंद महिरे, वाघमारे, जाधव, पवार यांनी राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, ज्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह छोट्या व्यवसायावर अवलंबून आहे व अशा व्यवसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था, जागा द्यावी तसेच सर्वांनाच एकाच मापदंडात तोलण्यात यावे. जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही ,अशी मागणीही सदर व्यवसायिकांनी केली आहे.

 

अजून बातम्या वाचा..

खा.श्रीकांत शिंदे यांनी मोफत फिरता दवाखाना व शासकीय सुविधा कार्यालयाचे केले कौतुक

खा.श्रीकांत शिंदे यांनी मोफत फिरता दवाखाना व शासकीय सुविधा कार्यालयाचे केले कौतुक

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत दवाखाना व मोफत शासकीय...

read more
गृहभेटीच्या माध्यमातुन केले जात आहे किचन गार्डन तयार करण्यासाठी मार्गदर्शन – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी – २

गृहभेटीच्या माध्यमातुन केले जात आहे किचन गार्डन तयार करण्यासाठी मार्गदर्शन – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी – २

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.अंतर्गत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग...

read more
आनंद सेवा केंद्र तर्फे मंगळवारी महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

आनंद सेवा केंद्र तर्फे मंगळवारी महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आनंद सेवा केंद्र मनमाड तर्फे सलग १४ वर्षांपासून भव्य अशा...

read more
अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वांगिण विकास – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वांगिण विकास – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

पोषण पधंरवडा २०२३ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी क्र.७५....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]