loader image
[ays_poll id=7]

कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार रु.५० हजार!

Sep 23, 2021

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधीकरण मार्फत रु.५० हजार देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधीकरणतर्फे सर्वोच्च न्यायालयात हि माहिती देण्यात आली.

कोरोनाचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याच्या मागणी करणार्‍या विविध याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देऊ शकत नाही असे म्हटले होते. याबाबत सुप्रीम कोर्टाने सरकारच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली होती. सुप्रीम कोर्टाने सरकारला स्वतः अशी व्यवस्था बनवण्यास सांगितले होते जेणेकरून मृतांच्या कुटुंबियांना सन्माननीय अशी रक्कम मिळाली पाहिजे.

३० जून रोजी दिलेल्या आदेशात सुप्रीम कोर्टाने देशात कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूची भरपाई देण्यास सांगितले होते.कोर्टाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला ६ आठवड्यांत भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतर राज्यांना माहिती देण्यास सांगितले होते. अशा आपत्तीमध्ये लोकांना नुकसान भरपाई देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. पण नुकसानभरपाईची रक्कम किती असेल हे ठरवण्याचे काम न्यायालयाने सरकारवर सोडले होते.

सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीवर सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की भूकंप, पूर यासारख्या १२ प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपत्ती कायद्याच्या कक्षेत येतात. या आपत्तींमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती निवारण निधीतून ४ लाख रुपयांच्या भरपाईचे आश्वासन दिले जाते; पण कोरोना महामारी त्यापेक्षा वेगळी आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचा हा युक्तिवाद मान्य केला होता. कोविड मृतांच्या नातेवाईकांना किती रक्कम द्यायची हे सरकारने स्वतः ठरवावे; पण नुकसानभरपाई दिली पाहिजे असे कोर्टाने म्हटले होते. यावर राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधीकरणतर्फे सदरील रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...

read more
जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

नांदगांव : मारुती जगधने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष...

read more
बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या  मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक - राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची...

read more
अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

हरियाणा येथे झालेल्या ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.