महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार थांबताना दिसत नसल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबईतील बलात्काराच्या घटना ताज्या असताना डोम्बिविलीतून एक अमानुष घटना समोर आली आहे. डोम्बिविलीत एका १५ वर्षीय मुलीवर ३३ नराधमांनी ९ महिने अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीमध्ये २ अल्पवयीन व इतर आरोपी २० ते ३० वर्ष वयोगटातील आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, महाविकास आघाडीची सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याची जोरदार टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.










