- मेष राशी : व्यावहारिक वर्तन राखा. विचारपूर्वक कृती करा. चर्चा करण्यापेक्षा कृतीला महत्त्व असते हे लक्षात ठेवा. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे हिताचे. कायदे पाळा.
- वृषभ राशी : तब्येत सांभाळा. हट्ट सोडणे, समजुतदारपणा दाखवणे हिताचे. नियम-कायदे पाळणे लाभाचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे सोयीचे.
- मिथुन राशी : हुशारीने प्रगती कराल. अविवाहितांच्या विवाहाचे योग आहेत. प्रेमात यशस्वी व्हाल. घरच्यांना वेळ द्याल. नोकरीत स्थैर्याला महत्त्व देणे हिताचे. कोणाची मदत घ्यावी आणि कोणाची नाही हे विचारपूर्वक ठरवणे हिताचे.
- कर्क राशी : कामातून ओळख तयार कराल. प्रतिष्ठा वाढेल, कौतुक होईल. संवाद सुरू ठेवा पण वाद टाळा. जोडीदाराला वेळ द्या.
- सिंह राशी : अतिरेक टाळा. क्षमता ओळखून वागा. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. संवादातून प्रश्न सोडवाल. कौतुक होईल. आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता राखा.
- कन्या राशी : व्यावहारिक वर्तन राहील याची खबरदारी घ्या. पूर्ण खात्री करुन नंतर मोठे निर्णय घ्या. वाद टाळणे हिताचे. प्रसंगी परिस्थितीशी जुळवून घेणे सोयीचे.
- तूळ राशी : हुशारीने वागणे, गोड बोलणे हिताचे. जोडीदाराला वेळ द्या. वाद टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगती होईल.
- वृश्चिक राशी : आत्मनिर्भर होणे हिताचे. नियोजनाचा आणि गोड बोलण्याचा लाभ होईल. वाद टाळणे हिताचे. अडचणींतून मार्ग काढाल. शत्रूवर मात कराल. घरच्यांना वेळ द्याल.
- धनु राशी : प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. वाद टाळा. क्षमता ओळखून कृती करा. नियोजन लाभाचे.
- मकर राशी : हुशारीने प्रगती कराल. अडचणींतून मार्ग काढाल. ज्येष्ठांची आणि गुरुजनांची सेवा करण्याचा योग आहे. क्षमता ओळखून कृती करा. स्वतःशी प्रामाणिक राहा.
- कुंभ राशी : नियोजनाने आणि वाद टाळण्याने जास्त लाभ होईल. मौन बाळगणे किंवा गोड बोलणे यामुळे अनेक अडचणी दूर होतील. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. कायदे पाळणे हिताचे.
- मीन राशी : शब्द जपून वापरणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे फायद्याचे. निर्णय विचारपूर्वक, सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन घेतल्यास लाभ होईल. आत्मनिर्भर होणे लाभाचे. आर्थिक नियोजन करणे फायद्याचे.
राशी भविष्य : २२ जून २०२५ – रविवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....


