loader image
[ays_poll id=7]

नाशिकजवळच्या औंढेवाडीत मानवतेला काळिमा – नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !

Sep 29, 2021


महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही, दररोज राज्यातील विविध भागातून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. नाशिकजवळील औढेवाडी येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे, एका नऊ वर्षाच्या मुलीवर पळत ठेऊन घराजवळील शेतात नेऊन तिच्यावर एका ४३ वर्षीय आणि एका अल्पवयीन दोघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

सध्या शेतीची कामे सुरू असल्यामुळे मुलीचे आई-वडील तिला घरात सोडून शेतात कामाला जात असत. मुलगी घरात एकटी असते, यावर नजर ठेवून गणेश ऊर्फ शंकर निवृत्ती कुंदे (वय 43, रा. औंढेवाडी) याने तिच्या राहत्या घरी शेतात नेऊन बलात्कार केला. अत्याचार केल्याची माहिती कुणाला सांगितल्यास  कुटुंबाला ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलानेही मुलीवर जवळपास तीन वेळा अत्याचार केला. त्यामुळे मुलीच्या पोटात दुखू लागले. हा त्रास असह्य झाल्याने तिने आई-वडिलांना सांगितले. आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तातडीने दोघांविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन संशयितासह गणेश कुंदेला बेड्या ठोकल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

उत्तर महाराष्ट्रातील पहिले “रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर” मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सुरु

उत्तर महाराष्ट्रातील पहिले “रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर” मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सुरु

प्रतिनिधी : उत्तर महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे उदघाटन नाशिकचे लोकप्रिय...

read more
बाळासाहेबांची शिवसेना तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

बाळासाहेबांची शिवसेना तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

दिनांक 17 नोव्हेंबर बुधवार रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाने मनमाड शहरात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मनमाड ची विदयार्थीनी सिया दिपक राऊतराय हीची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मनमाड ची विदयार्थीनी सिया दिपक राऊतराय हीची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

मनमाड : क्रीडा व युवक संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित...

read more
.