तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












