महाराष्ट्रात झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे निवेदन नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
मराठा आरक्षणाकरिता सबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. कोर्टात केस गेली अजूनही त्यात आंदोलने, मिटींग चालू आहेत. आरक्षणाकरीता समाजाचा लढा सुरू आहे. परंतु सदर आदोलना दरम्यान महाराष्ट्रातील ४२ युवकांनी मराठा आरक्षण मिळण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली. समाजासाठी बलिदान दिले त्यातील सर्व युवक कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर होती परंतु ते हयात नसल्याने त्यांचे सर्वांचे कुटुंबाची परिस्थिती हलाकीची झाली आहे. त्याकरिता शासनाकडून त्यांना मदत म्हणून ह्या ४२ युवकांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत त्या जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने मदत होईल असे ही निवेदनात आ.कांदे यांनी नमूद केलेले आहे













