loader image
[ays_poll id=7]

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचे त्वरित पंचनामे करून उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर उपाययोजना करा – ना.डॉ.भारती पवार

Oct 1, 2021

अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्याप्रणात शेती व शेतपिकांचे, गुरे जनावरांचे नुकसान झाले आहे त्याच बरोबर शहरी भागासह गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुकाने, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाधित भागातील नागरिक मोठ्या संकटात सापडले असून झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना शासनामार्फत आपत्कालीन मदत मिळवून देण्याकरिता ना.डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे पत्र देऊन भ्रमणध्वनीवरून चर्चा करत सूचना केली आहे.

जिल्हयात अतिवृष्टीमुळे ३४ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावरील खरीप व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान मालेगाव येवला व नांदगाव तालुक्यात झाले आहे. मका पिकाचे सर्वाधिक नुकसान असून त्या खालोखाल बाजरीचे नुकसान असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. पंचनामे केल्यानंतर या नुकसानीची वास्तवदर्शी माहिती उपलब्ध होऊ शकेल.

मका, बाजरी, सोयाबीन, कांदा रोपवाटिका यांचे २२३४५ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्या खालोखाल नांदगाव तालुक्यात मका, बाजरी, फळबागा यांचे १०५४४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने दर्शविला आहे. त्यानंतर निफाड तालुक्यात मका, सोयाबीन, कांदे यांचे १७७० हेक्टरवर नुकसान झाले असून दिंडोरी तालुक्यात १० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.
जिल्ह्यात खरीप व लेट खरिप कांद्याच्या साधारण ९२०० हेक्टरवर रोपवाटिका असून त्यापैकी २५५२ हेक्टर क्षेत्रावरील रोेपवाटिकांना या पावसाचा फटका बसला आहे. खरिपातील मकाचे सर्वाधिक १८९६५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. सोयाबीनचे १३८१ हेक्टरवर नुकसान झाले असून बाजरीचे ६४५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. कपाशीचे सर्वाधिक नुकसान मालेगाव तालुक्यात झाले आहे. तेथे ४५६६ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे.

तसेच अतिवृष्टीमुळे ठीकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अगोदरच आरोग्य यंत्रणेंला सतर्क करून साथीच्या रोगांना वेळीच आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपायजोजना कराव्यात जेणेकरून अगोदरच कोरोना संकटात सापडलेल्या नागरिकांना ह्याचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्याची पथके तयार ठेवण्याच्या सूचनाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.