loader image
[ays_poll id=7]

“अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे…” – खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य

Oct 2, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना शरद पवारांना पंतप्रधानपदी आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणेच पंतप्रधानपदाची चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात वेळोवेळी होताना दिसते. तसेच राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या देखील मुख्यमंत्रीपदाची चर्चा सत्तास्थापनेवेळी पाहायला मिळाली. मात्र, यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना थेट कार्यकर्त्यांना आवाहनच केलं आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला पवार साहेबांना पंतप्रधान आणि अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं असल्याचं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना अमोर कोल्हे यांनी आपल्या मनातली इच्छा यावेळी बोलून दाखवली. त्याचवेळी, त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या इच्छेसाठी ताकद उभी करण्याचं देखील आवाहन केलं आहे.

अजून बातम्या वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण...

read more
कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय...

read more
सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी...

read more
बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका...

read more
.