loader image
[ays_poll id=7]

रेल्वे उड्डाणपुलाचे नूतनीकरण करण्याची मनमाड शहर भा. ज. पा ची मागणी

Oct 3, 2021

मनमाड शहर भाजपा च्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना मनमाड शहरातून गेलेल्या राज्य महामार्ग क्रमांक 10 (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी) च्या दुरावस्थे संदर्भात तक्रार व शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचे नूतनीकरण करण्याची मागणी‼️

मनमाड शहर भाजपा च्या वतीने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री  नितीनजी गडकरी यांची केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री  डॉ भारतीताई प्रवीण पवार यांचे नेतृत्वाखाली भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, पंकज खताळ, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी मनमाड भाजपा संगठन सरचिटणीस नितीन परदेशी यांचे शिष्टमंडळाने संवाद करून मनमाड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 10 ( राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी) यांचे दुरावस्थे संदर्भात तक्रार केली व या संदर्भात दोषीची चौकशी होऊन कार्यवाही ची मागणी देखील करण्यात आली आणि याच महामार्ग वर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे नूतनीकरण करणे बाबत मागणी ही शहर भाजपा च्या वतीने या प्रसंगी करण्यात आली मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून राज्य महामार्ग क्रमांक 10 हाच महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी म्हणून देखील ओळखला जातो या महामार्गावर मनमाड शहरातील सहा शाळा मनमाड बस स्थानक ,मनमाड उपजिल्हा रुग्णालय, विविध धर्मीय ची धार्मिक प्रार्थना स्थळे आहेत गेल्या 5 ते 7 वर्षा पासून या महामार्ग ची प्रचंड दुरवस्था झाली आहे मनमाड शहर तसेच या महामार्ग वरील रेल्वे उड्डाण पूल येथे या महामार्ग दुरावस्थे मूळे झालेल्या रस्ते अपघाता मूळे शेकडो निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत सध्या या महामार्ग च्या दुरुस्ती साठी भाजपा सह अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटना नी मोठी जन आंदोलने केली परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची स्थायी दुरुस्ती करण्यात आलेली नाही तात्पुरते स्वरूपात डागडुजी करून वेळ मारून नेण्या चा प्रकार सातत्याने घडत आहे मनमाड कोपरगाव इन्फ्रास्ट्रक्चर टोल प्रा.लिमिटेड ही खाजगी कंत्राटदार कंपनी नागपूर ह्या महामार्ग चे देखभाल /देखरेखी चे कार्य बघत आहे य परंतु ह्या कंपनी च्या बेजबाबदार व हलगर्जीपणा पणा मुळे अनेकांनचे प्राण घेतले आहेत या कंपनीचे अधिकारी कर्मचारी दादागिरी ने वागतात आणि सर्व सामान्य नागरिकांन च्या तक्रारी कडे दुर्लक्ष करतात तसेच याच महामार्ग वर मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलाची देखील अत्यंत दुरवस्था झाली आहे हा उड्डाण पूल जुना असून त्यांचे बांधकाम ची मुदत संपली आहे यांचे कोणत्याही प्रकारे बांधकाम ऑडिट झालेले नाही त्यामुळे या रेल्वे उड्डाण पुलावर कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे याची गंभीरता देखील रस्ते प्रशासन व या देखभाल कंपनी ला नाही मनमाड शहर भाजपा वतीने गंभीर समस्या कडे आदरणीय नितीनजी गडकरी यांचे मनमाड भाजपा पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आणि या मनमाड शहरा च्या अंतर्गत मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गक्रमांक 752 जी राज्य महामार्ग क्रमांक 10 च्या दुरावस्थे ची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित रस्ते प्रशासन व या महामार्ग च्या देखभाल कंत्राटदार कंपनी वर कडक कार्यवाही करावी अशी मागणीही केली तसेच या महामार्ग वर असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे त्वरित बांधकाम ऑडिट करून या उड्डाण पुलाचे आपले केंद्रीय मंत्रालयाचे माध्यमातून नव्याने नूतनीकरण करण्यात यावे अशी ही मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी अत्यंत गंभीरतेने ही समस्या/मागण्या ऐकून घेतल्या मनमाड शहरातून जाणाऱ्या या महामार्ग ला पर्याय म्हणून आगामी काळात बायपास महामार्ग ( शहारा बाहेरून )करण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संवाद मध्ये दिले या केंद्रीय मंत्री गडकरी यांचे शी झालेल्या या संवाद मध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारतीताई पवार भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,पंकज खताळ मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी सहभाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
.