loader image
[ays_poll id=7]

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ! डॉ.भारती पवार यांचेकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी..

Oct 4, 2021


सध्या नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडून काढले असून जोरदार पावसाने ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माब होऊन शेतकऱ्यांचा शेतीचे, शेतमालाचे, नागरिकांचे, दुकानदार व्यापाऱ्यांचे तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .अनेक ठिकाणी पाझर तलाव क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे बंधारे, पाझर तलाव फुटून त्या परिसराचे नुकसान झाले. आधीच कोरोना संकटातून जनता सावरत नाही तोच अस्मानी संकटाने पुन्हा एकदा तडाखा देत संपूर्ण जनजीवन विस्कळीत करत मोठे नुकसान केले आहे .बहुतांशी भाग हा पाण्याखाली गेल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे ह्या सर्वांचीच पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व बालकल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी निफाड येवला मतदार संघातील बाधित गावांना जाऊन पाहणी केली. लासलगाव परिसरातील गावांना भेट देत तेथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली नंतर लासलगाव येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी केली .या प्रसंगी ना.डॉ.भारती पवार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्यात अधिकाऱ्यांनी दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई नुकसानग्रस्तांना मिळावी यासाठी अधिकारी वर्गास सूचना केल्या. या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे, वाहून गेली आहे गाढवे नाल्याला पूर येऊन प्रतापसागर तलाव फुटल्याने तेथील आदिवासींच्या घरांचे मोठ्याब प्रमाणात नुकसान झाल्याने ते उघड्यावर आले बाधित नागरिकांना तातडीची मदत द्या त्यांना शासनाच्या आपत्कालीन निधीतून तात्पुरत्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याची सूचना केली या प्रसंगी निफाड भाजप तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते ,जिल्हा परिषद सदस्य व लासलगाव भाजपा मंडल अध्यक्ष डी के नाना जगताप भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णताई जगताप, ओ बी सी भाजपा प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार घोरपडे साहेब, आरोग्य अधिकारी डॉ. राठोड,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, राजेंद्र चाफेकर ,पंढरीनाथ पीठे यांचेसह असंख्य शेतकरी ,नागरिक ,व्यापारी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.