मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश यांचे आदेशाने नांदगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती व मनमाड वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने मनमाड नगर पालिकेत विधी प्राधिकरना मार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या मोफत सेवां विषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.अध्यक्ष स्थानी मुख्याधिकारी मुंढे साहेब होते.शिबिराची प्रस्तावना वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे यांनी केली,लीगल एड पॅनल वरील अॅड.रमेश अग्रवाल यांनी शिबिरामध्ये जे नागरिक आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत,तसेच गरीब महिला,ज्यांची वकील नेमण्याची आर्थिक परिस्थिती नाही अश्या लोकांनी विधी प्राधिकरण कडे अर्ज केल्यास त्यांना मोफत वकील कोर्टाकडून मिळू शकतो अशी माहिती देण्यात आली..मुंढे साहेब यांनी देखील मार्गदर्शन केले,कार्यक्रमास लीगल पॅनलचे अॅड. व उपाध्यक्ष अॅड. पालवे, अॅड. मुनिया गुप्ता मॅडम, अॅड. ममता गुप्ता मॅडम,खजिनदार अॅड. निकम,सह सचिव अॅड. बापट ,राजेन्द्र पाटील,अशोक पाईक,नाना जाधव व इतर नगर पालिकेचे कर्मचारी हजर होते.
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...












