loader image
[ays_poll id=7]

भारतीय संस्कृती चा विकास हा बौद्धिक मालमत्ते चा अविष्कार प्राचार्य _डॉ बेटकर

Oct 5, 2021

येवला – बौद्धिक मालमत्ता आपल्या देशात अतिशय समृद्ध आहे महोजोदडो , हडप्पा,येथील वास्तुशिल्पकला तसेच अंजठा व वेरूळ येथील लेणी
तसेच अनेक ठिकाणची मंदिरे व हजारो वर्षापुर्वीचे उपलब्ध आसणारी अवशेष यातुन झालेली भारतीय संस्कृती ची जपणूक व जागतिक पातळीवरील भारताचे संशोधन क्षेत्रातील योगदान हा भारतीय बौद्धिक मालमत्तेचा अविष्कार असल्याचे प्रतिपादन औसा येथील कुमार स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेश्वर बेटकर यांनी केले येथील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनार परिषदेत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनराज गोस्वामी होते, अभासी पध्दतीने आयोजित केलेल्या या परिषदेत देशभरातील अनेक महाविद्यालयातील प्राचार्य, संशोधक,प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी नी सहभाग नोंदविला, आपल्या भाषणात बोलताना डॉ बेटकर यांनी अनेक उदाहरणे देऊन बौद्धिक संपदा ही आर्थिक संपत्ती पेक्षा श्रेष्ठ असल्याचे पठवुन दिले, इसवी सन पूर्व ५०० वर्षापूर्वी पासून चा देशाची, भौगोलिक, आर्थिक व बौद्धिक या बाबींचा ऊहापोह करताना डॉ बेटकर यांनी भारतीय संस्कृती ही खर्या अर्थाने सोन्याची खाण आहे व ही संस्कृती व वारसा टिकवून ठेवण्यासाठी बौद्धिक मालमत्ता अबाधित राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे या देशाने अनेक नवनवीन शोध जगाला दिले, पाश्चिमात्य देशांमध्ये आपली संस्कृती आजही तेवढ्याच नाविन्यपूर्ण पणे जोपासली जाते त्यामागे भारतीयाची बौद्धिक मालमत्ता असल्याचे ते म्हणाले आपल्या व्याख्यानात बोलताना डॉ बेटकर यांनी बौद्धिक मालमत्तेचची वर्गवारी तसेच त्यातील प्रकार सविस्तर पणे श्रोत्यांना सांगितले, तसेच पेटंट, काॅपी राईट कायदा व त्यात वेळोवेळी झालेले बदल याबाबत सविस्तर विवेचन डॉ बेटकर यांनी दोन तास चाललेल्या या अभासी सभेत केले शेवटी आपल्या भाषणात बोलताना डॉ बेटकर यांनी प्रत्येक व्यक्ती मध्ये नाविन्यपूर्ण बौद्धिक मालमत्ता असते फक्त आपण कशाप्रकारे सादरीकरण करतो यावर सर्व अवलंबून आहे व हे काम शिक्षणाच्या माध्यमातून सोपे होते, आणि म्हणून ही सर्व जबाबदारी आपल्यासारख्या उच्च शिक्षितांची जास्त आहे असेही शेवटी ते म्हणाले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनराज गोस्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, आपल्या प्रस्ताविकात बोलताना डॉ गोस्वामी यांनी येवला हे पैठणी साडीचे माहेरघर असुन त्यातच येवलेकरांची बौद्धिक संपदा जाणवते, असे असंख्य अविष्कार प्रत्येक मनुष्य प्राणी मध्ये दडलेले आसतात, सादरीकरण करण्यात आपण कमी पडतो, आजच्या या वेबिनार परिषदेच्या मदतीने आपण सर्वांनी बोध घेऊन जास्तीत जास्त पेटंट जागतिक स्तरावर मानव कल्याण साठी दिले पाहिजे. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता अश्वासीत कक्षाचे समन्वयक प्रा अजय त्रिभुवन यांनी सुत्रसंचालन केले तर राष्ट्रीय वेबिनार चे समन्वयक डॉ साहेबराव धनवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला ग्रंथपाल नितीन बच्छाव यांनी उपस्थिताचे आभार मानले याप्रसंगी तामिळनाडू, केरल, कर्नाटक उत्तर प्रदेश पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेशमधील ५०० हुन जास्त प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वितेसाठी पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ साहेबराव धनवटे, गणित विभाग प्रमुख प्रा श्रीमती पांडे एस सी यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.