मनमाड : हिंदु धर्मामध्ये मोठ्या भक्ती-भावाने साजरा करण्यात येणारा देवीमातेचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव या उत्सवामध्ये नऊ दिवस भाविक भक्त हे देवीचा जागर करून ,उपवास करून मोठ्या आनंदात नवरात्र उत्सव साजरा करत असतात. गेल्या वर्षी या उत्सवावर कोरोनाची संकट असल्याने इतर सणा प्रमाणे नवरात्री देखील मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती , यंदाच्या वर्षी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण असल्याने राज्य सरकारद्वारे नवरात्रीच्या दिवसांपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येणार असल्याने भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी लागणारे पुजेचे साहित्य ,घट , देवीची मुर्ती इत्यादी वस्तुंची दुकाने शहरातील बाजारपेठेत लागली असुन ग्राहकांचा मात्र खरेदीसाठी सध्या अल्प प्रतिसाद मिळत आहे.पुढील दोन दिवसांत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने नवरात्री साठी लागणाऱ्या सर्व पुजेच्या साहित्यांची दुकाने बाजारपेठेत सजलेली आहे.













