दरवर्षी नगरपालिकेतर्फे ५% दिव्यांग निधी देण्यात येतो, सदर निधी यावर्षी दिवाळी पूर्वी देण्यात यावा या आशयाचे निवेदन २ ऑगस्ट रोजी भाजप दिव्यांग आघाडी मनमाड तर्फे देण्यात आले होते परंतु मनमाड नगरपालिकेतर्फे आजपावेतो कोणतीही कारवाही न केल्यामुळे भाजप दिव्यांग आघाडीतर्फे मंगळवार दि.६ ऑक्टोबर रोजी भाजप दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख यांच्या नेतृत्वात नगरपालिका परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनमाड मुख्याधिकारी मिटींगसाठी बाहेरगावी गेले असल्याकारणामुळे पालिकेतर्फे पाटील साहेब यांनी निवेदन स्वीकारले व जाधव साहेब, कातकाडे साहेब व आगवणे साहेब यांनी मुख्याधिकारी यांचेशी फोनवर चर्चा करून मुख्याधिकारी यांची भेट घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले व आंदोलन मागे घेण्यात आले.
सदर प्रसंगी शहर उपाध्यक्ष कमलेश कलापुरे, शांताराम आहिरे, दिनेश चावरिया, फारूक शेख, अर्षद शेख, नविद शेख, योगेश रानडे, संतोष पगारे, सुभाष सांगळे, प्रवीण तेलंग, राजू चरहाटे, नसरींन शेख, मंदाबाई रेडे, दर्शन परदेशी, अजीज शेख, निकम ताई, यशवंत इप्पर, अशोक गायकवाड, वाल्मिक देडगे, अशोक देशमुख, दौलत बोबडे, गौतम जोगदंड, सचिन गरूड, संजय साबळे, संतोष घोडेकर, मोहसीन कुरेशी, भवेश, जयेश शेलार, आप्पा गवळी, सुमीत आहिरे, इब्राहिम सय्यद, चेतन गवळी, इब्राहिम शेख, सुनिल सोनपरोते, जिलानी अत्तार, राजाराम गिते, आदि दिव्यांग बांधव उपस्थित होते.













