मनमाड रेल्वे गेट न २ पर्यायी मार्ग दुरुस्ती करुन डांबरीकरण करावे, या मागणीचे निवेदन तालुक्याचे माजी आमदार संजय पवार व ग्रामस्त यांनी नांदगाव येथील तहसीलदार यांना दिले. मनमाड शहरातून जाणारा व ग्रामीण भागातील वंजारवाडी, सटाणे, क-ही, माळेगाव, एकवई, मोहेगाव, भालुर, लक्ष्मीनगर, मांडवड, लोहशिंगवे व बेजगाव या भागातुन येणा-या दहा ते बारा गावांच्या ग्रामस्थांना मनमाड व जिल्ह्याच्या ठिकाणी दळण वळण करण्यासाठी मनमाड स्टेशन औरंगाबाद लाईन गेट न २ हा मुख्य मार्ग होता परंतु रेल्वे प्रशासनाने संबधित गेट न २ बंद करुन भुयारी मार्ग बनविला. पावसाळ्यात त्या भुयारी मार्गाला नैसर्गिक पाणी उतरते व पाउस थांबल्या नंतर दोन – तीन दिवस त्यात पाणी उपसा करुनही पाणी कमी होत नाही, संबंधित गावातील लोंकाना दळवळणा करीता रस्ता पुर्णपणे बंद असतो, त्यामुळे परिसरातील शेतकरी विद्यार्थी या गावातील रुग्न तसेच व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते, तरी मनमाड जाण्या-येण्यासाठी गेट नं. २ पुर्ववत करावे किंवा गेट नं. २ साठी असलेला पर्यायी रस्ता अतिशय नित्कृष्ट दर्जाचा असून मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याचे लकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे, सदर निवेदनानंतर जर पर्यायी रस्ता हा उपलब्ध न झाल्यास संबधित गावातील ग्रामस्थांना बरोबर घेउन लोकशाही मार्गाने रेल रोको आंदोलन, रस्ता रोको किंवा आमरण उपोषनाचा मार्ग अवलंबीला जाईल. त्या पासून होणा-या परीणामास केंद्र व राज्य सरकारचे आधिकारी व स्थानिक लोकप्रतिनाधी जबाबदार राहतील, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.
सेंट झेवियर शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिन...










