Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वैज्ञानिक दृष्टिकोन अनुकरणानेच भारत प्रबुद्ध होईल : डॉ.संग्राम पाटील

Oct 14, 2021

 

येवला : अविद्देतून बोधी म्हणजेच अज्ञानातून प्रज्ञेकडे जाने हाच दुःख मुक्तीचा मार्ग असून विवेकी वर्तनाने धर्म वा धम्मानुकर हेच खरे मानवी धर्माचे खरे विज्ञान आहे,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हे सामाजिक उत्थानचे क्रांतीपाऊल होते ज्याने जगातील तमाम प्रकारच्या गुलामांना मुक्तीचे वाट दाखवली आहे असे उदगार जागतिक कीर्तीचे प्रतिभा संपन्न वैद्य डॉ.संग्राम पाटील (लंडन) यांनी मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी येवला यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२१ उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
धर्मांतर घोषणेचा ८६ वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून १३ ते १७ ऑक्टोबर देश विदेशातील नामवंत साहित्यिक,पत्रकार,व्याख्याते यांच्या उद्बोधक विचारांचा जागर होत आहे.

धर्माचे विज्ञान आणि विज्ञानाचा धर्म या विषयावर व्याख्यानात बोलताना डॉ.संग्राम पाटील म्हणाले की,तथागत बुद्धाने सांगितले तत्वज्ञान म्हणजेच २२ प्रतिज्ञा आहेत,चिंतनातून ज्ञान मिळविणे म्हणजे विज्ञान होय,धर्माचा वापर परीयत्ति आणि परीपट्टी नुसार व्हावा म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिकल नुसार व्हावा जे धारण केले जाते तो त्याचा धर्म असतो ,दुःख मुक्तीचा मार्ग आर्यष्टांग पालन हाच आहे,मानवी तृष्णा नष्ट झाल्या तो व्यक्ती भगवान होतो.जो पर्यंत आपण धम्म धारण करत नाही,धम्माअनुकरन करत नाही तोवर आपण धर्मांतरित झालो असे म्हणता येणार नाही,तथागत बुद्धाचा जीवन मार्ग हा आचरणावर आधारलेला आहे असे मत डॉ.संग्राम पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  बामसेफ जिल्हा अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी डॉ.प्रमोद बिऱ्हाडे हे होते , प्रास्ताविक मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ सर यांनी केले.तर सूत्रसंचलन मिलिंद गुंजाळ सर,तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी (मुंबई) यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश खळे,शैलेंद्र वाघसर,सुभाष वाघेरेसर,अक्षय गरुड,प्रा,बाबासाहेब अहिरे,देविदास केदारे,,बाळासाहेब जाधव,सुभाष गांगुर्डे, महेंद्र पगारे,संजय पगारे,वनिता सरोदे-पगारे,अमीन शेख,नितीन केवटे,अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे,अखिल गांगुर्डे,प्रशिल शेजवळ,राजरत्न वाहुळ आदींनी परिश्रम घेतले.

 

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या...

read more
माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी किलकारी या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ)...

read more
13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त नीलमणी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त नीलमणी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी) माघी श्री...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]