Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात नेत्रतपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न…

Oct 14, 2021

मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व रोटरी क्लब मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना नियमांचे पालन करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शनाखाली 14 ऑक्टोबर हा संस्थेच्या विश्वस्त संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्र तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी क्लब मालेगाव येथील टेक्नोसीएन मॅट्रिस्ट श्री योगेश मार्तंड व सहाय्यक श्री राकेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी केली व डोळ्यांची काळजी व निगा कशी राखायची यासंदर्भात विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकातील तीन विद्यार्थ्यांची निवड करून आरोग्य संपदा योजनेअंतर्गत मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात आल्या.
कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन.ए. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डी.डी.हिरे यांनी केले. कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ ज्योती पालवे ,किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.पी.के.बच्छाव कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा.विठ्ठल फंड कुलसचिव समाधान केदारे प्राध्यापक वृंद,कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकारी बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोयनांदगाव जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा उपक्रम

पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय
नांदगाव जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा उपक्रम

नांदगाव, दि 18 मार्च 2022 उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे कासावीस झालेल्या...

read more
जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनिअर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी अद्ययावत...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो. च्या वतीने ना.आठवले यांना विविध मागण्यांचे निवेदन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो. च्या वतीने ना.आठवले यांना विविध मागण्यांचे निवेदन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]