दिवाळी सण काही दिवसांवर आलेला असताना नगरपालिका कामगारांना देय रक्कम अदा करण्यात यावी या मागणीचे निवेदन सिटू कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदनात कामगारांना देय रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात यावी, हि मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन मनमाड नगर परिषद प्रशासकीय अधिकारी श्री.राजेद्र पाटील यांना देण्यात आले.
यावेळी सिटू संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ.जॉनी जॉर्ज, उपाध्यक्ष कॉ हाजी असलम शेख, उपाध्यक्ष कॉ अरुण दरगुडे, खजिनदार कॉ.विकास गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.











