सह्याद्री पर्वत रांगेतील साल्हेर-मुल्हेर या जोडीतला साल्हेरचा किल्ला हनुमान ट्रेकर्स ग्रुप ने सर केला. सह्याद्री पर्वत रांगेतील साल्हेर-मुल्हेर या जोडीतला साल्हेरचा किल्ला असून किल्ल्याची उंची 5175 फूट आहे, जिल्ह्यामधील 66 गिरिदुर्गामध्ये सर्वात उंच किल्ला हा साल्हेर आहे. किल्ल्याच्या माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. या टेकडीवर भगवान परशुरामाचे मंदिर आहे. गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा गंगासागर तलाव आहे. गंगासागर तलावाशेजारी गंगा-यमुना टाके आहे. याचे पाणी व गंगोत्री-यमनोत्रीच्या उगमाचे पाणी सारखे आहे, असे डॉ. रघुराज महाराज यांनी संशोधन केले होते. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत. गडाच्या पायथ्याला साल्हेर निवासिनी गडकालिका देवीचे सुंदर मंदिर आहे तसेच गृहस्वरूप अमृताभवानी व सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे. माथ्यावर रेणुका देवीचे मंदिर असून ही भगवान परशुरामाची माता आहे. माथ्यावरूनच बाण मारून परशुरामाने कोकणची निर्मिती केली होती, अशी आख्यायिका आहे. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले आहे. समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. मनमाड येथील हनुमान ट्रेकर्स ग्रुप ने संपूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घातली. सदर मोहिमेत मनमाड चे मा.नगराध्यक्ष योगेश (बबलू) पाटील, डॉ.योगेश मगर, डॉ.भाऊराव देवरे, राजेंद्र नागरे, गणेश आहेर, किरण भाबड, भागवत झाल्टे, विशाल पाटील, रवी छाजेड, संदेश उगले, श्रेयस देवरे ( वय वर्षे 8) यांनी सहभाग घेतला व मोहीम फत्ते केली .
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...












