loader image
[ays_poll id=7]

मंत्र्यांनी केवळ खुर्च्यांवर बसू नये, प्रतिहल्ले करावेत – खा.संजय राऊत

Oct 18, 2021


‘सरकारवर होणाऱ्या टीकेला केवळ शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे किंवा संजय राऊत यांनीच उत्तर द्यायचं का? सत्तेत बसलेल्या व सत्ता भोगणाऱ्या सर्वांची ती जबाबदारी आहे. टीकेला रोखण्याची जबाबदारी सरकारमधील सर्व मंत्र्यांची आहे. त्यांनी आता केवळ खुर्च्यांवर बसू नये. प्रतिहल्ले करावेत,’ असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केलं.महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आता शांत राहू नये. हल्ल्या प्रतिहल्ला आणि टोल्याला प्रतिटोला हाणावा. किंबहुना आता सर्व मंत्र्यांना बोलावंच लागेल. तसं झालं तर भाजपवाले आठ दिवसांत पळून जातील,’ असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. ‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर व आघाडीच्या नेत्यांवर खालच्या दर्जाची टीका सुरू आहे. कमी प्रतीचा गांजा विरोधकांनी मारल्यामुळं अशा प्रकारे टीका केली जात आहे,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.


अजून बातम्या वाचा..

चांदवड प्रांत कार्यालयातील उप कोषागार ला १०००० रुपयाची लाच स्वीकारताना अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

चांदवड प्रांत कार्यालयातील उप कोषागार ला १०००० रुपयाची लाच स्वीकारताना अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

प्रांत कार्यालय येथील कोषागार अधिकारी सुनिल तडवी राहणार चांदवड यांनी तक्रारदार यांचे पाच ते सहा...

read more
‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई/नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२२ - मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली...

read more
जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : भाजप – शिंदे गटाची सत्ता,एकनाथ खडसेंच्या पत्नींचा पराभव

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : भाजप – शिंदे गटाची सत्ता,एकनाथ खडसेंच्या पत्नींचा पराभव

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप- शिंदे गटाने 20...

read more
.