Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

धम्मानुवर्तन हिच व्यक्ती,समाज,संस्था संघटनांची जबाबदारी : शाम तागडे

Oct 18, 2021

येवला (प्रतिनिधी) : पंचशील,आर्यष्टांग मार्ग आचरणातून दुःख मुक्ती हाच तथागत बुद्धाच्या जीवन तत्वज्ञान,बुद्ध धम्माचा पाया असून मानवी देहातील विकार-वासना,द्वेष,मत्सर,हाव-हव्यास,मोह त्यागल्या शिवाय मानव सुखी होणे कठीण आहे.समस्त मानवी कल्याणाचा विज्ञानवादी धम्माचे धम्मानुवर्तन (धम्म आचरण) हिच व्यक्ती,समाज,संस्था संघटनांची जबाबदारी आहे असे मत महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव शाम तागडे यांनी मुक्ती महोत्सव २०२१ मध्ये आयोजित ऑनलाईन व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.
धर्मांतर घोषणेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी येवला चे निमंत्रक, प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन मुक्ती महोत्सवाचे समारोप सत्रातील धम्म चळवळीची दिशा व धम्म प्रचारक व्यक्ती,संस्था संघटनांची जबाबदारी या विषयावर शाम तागडे बोलत होते.धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी बाल-युवक युवतींचे अभ्यासवर्ग,धम्म संस्कार शिबीर होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.धम्म प्रचार प्रसार करतांना त्या व्यक्ती,संस्था, संघटनांनी पंचशील, आर्यष्टांग मार्गाचे अनुपालन करणे आवश्यक असून धम्म हा आपल्या वर्तन,वाणी,आचार-विचारातून दिसायला हवा असे हि तागडे म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येवला,पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ हे होते.ईकरा शाह हि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.मिलिंद गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले.तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी,सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी ससूत्रसंचालन केले.अझहर शाह सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक, प्रवर्तक शरद शेजवळ यांनी आभार मानले.
शैलेंद्र वाघ सर,सुभाष वाघेरे सर,सुरेश खळे,ज्योती वाघ,अक्षय गांगुर्डे,अमीन शेख,वनिता सरोदे-पगारे,सुरेशकाका सोनवणे,अभय लोखंडे,प्रशिल शेजवळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट

मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक पठाण यांचा ही राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक पठाण यांचा ही राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक रशिद पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]