loader image
[ays_poll id=7]

22 ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार !

Oct 18, 2021


राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. बैठकीत अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.


अजून बातम्या वाचा..

रशिया – युक्रेन युद्ध आणि चीन वरील कोरोना संकट ; जगातील एकतृतीयांश भागाला बसू शकतो मंदीचा फटका – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचे भाकीत

रशिया – युक्रेन युद्ध आणि चीन वरील कोरोना संकट ; जगातील एकतृतीयांश भागाला बसू शकतो मंदीचा फटका – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचे भाकीत

जगातील एकतृतीयांश भागाला २०२३ ह्या वर्षी मंदीचा फटका बसू शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी...

read more
टाटांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज ची ही आहे सत्यता

टाटांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज ची ही आहे सत्यता

सोशल मीडीयामध्ये अनेक उलट सुलट बातम्या त्यामधील सत्यता न पडताळता झपाट्याने शेअर होत असतात. सध्या...

read more
.