मनमाड मधील नुकतेच दिवंगत झालेले जेष्ठ समाजसेवक कै.पन्नालालजी शिंगी आणि कै. किशोरजी नावरकर यांच्या स्मरणार्थ
रा. स्व. संघ जनकल्याण समिती, एसएनजेबी संस्थेचे श्रीमती के.बी.आब्बड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व श्री आर.पी. चोरडिया हॉस्पिटल चांदवड आणि संस्कृती संवर्धन समिती यांच्या संयुक्त वतीने मनमाड शहरात कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे संयोजन उद्योजक अजित सुराणा, डाॅ.सुनिल बागरेचा, डाॅ.प्रताप गुजराथी आणि डाॅ.रविंद्र राजपूत यांनी केले आहे.
तरी ज्या नागरिकांचे अजून कोणतेही लसीकरण झाले नसेल अशा सर्व नागरिक बंधू-भगिनींनी आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
शिबिराचे ठिकाण :
१) डॉ.राजपूत यांचे देवकी हॉस्पिटल, आय.यु.डी.पी., मनमाड
२) डॉ.अमोल गुजराथी यांचे गुजराथी हॉस्पिटल, भवानी चौक, आय.यु.डी.पी., मनमाड













