मनमाड शहरातील थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त लहान मुलांसाठी पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डीवायएसपी साळवे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पैगंबर जयंतीनिमित्त चांगला उपक्रम राबविल्याबद्दल सगळ्यांना अभिनंदन केले तसेच तसेच साळवे साहेब यांच्या हस्ते सदरील रक्तदान कार्यक्रमात सर्वांना मास्क वाटप करण्यात आले, मनमाड शहर पोलीस निरीक्षक गीते साहेब यांनी ईद मिलादुन्नबीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. माजी आमदार जगन्नाथ धात्रक, डॉक्टर फहिम कुरेशी, डॉक्टर नाजिम शेख यांनी कार्यक्रमास भेट दिली. या कार्यक्रमात 191 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मनमाड रॉयल सोशल क्लब सिकंदर नगर, गौसिया ग्रुप कोतवाल नगर, डॉक्टर आंबेडकर नगर या सर्वांनी तसेच पालक वर्ग यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खालीद शेख यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेचे वार्षिक स्नेह-मिलन संपन्न….
मनमाड : हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून जनजाती कल्याण...










