Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडमध्ये ‘कोजागिरी पौर्णिमा’ उत्साहात साजरी….

Oct 20, 2021

आश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की या दिवसापासून शरद ऋतू म्हणजे हिवाळा सुरू होतो. शरद पौर्णिमेच्या रात्री लोक दूध बनवतात आणि मोकळ्या आकाशाखाली ठेवतात आणि प्रसाद म्हणून या दूधाचे सेवन करण्यात येते.

खरंतर चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवण्याला वैज्ञानिक महत्त्व आहे. वास्तविक, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. अशा स्थितीत चंद्राच्या किरणांचे रासायनिक घटक पृथ्वीवर पडतात. अशा परिस्थितीत जर दूध संपूर्ण रात्र चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवली गेली तर ते घटक दुधामध्ये शोषले जातात. या रासायनिक घटकांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे दुध पिल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. असे मानले जाते की जर हे दुध चांदीच्या भांड्यात ठेवली तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात.
शरद पौर्णिमा हा देवी लक्ष्मीचा प्रकट दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की याच दिवशी देवी लश्र्मी समुद्र मंथनातून उत्पत्ती झाली. त्यामुळे या दिवशी नारायणसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.

मनमाड शहरात देखील कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात नागरिकांकडुन साजरी करण्यात आली.शहरातील मनमाड गुरुद्वारा , श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र , कमलाक्षय गणपती मंदिर येथे भाविकांकडुन पौर्णिमा साजरी करण्यात आली. मनमाड गुरुद्वारा येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भजन , लंगर आणि अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र येथे रात्री बारा वाजता श्री लक्ष्मी ,श्री कुबेर आणि श्री चंद्र पुजन करून दूधाचाप्रसाद सेवेकऱ्यांना देण्यात आला.कमलाक्षय गणेश मंदिर येथे महिला भाविकांकडुन कोजागिरी पौर्णिमा दिपउत्सव आणि भजन म्हणून साजरी करण्यात आली.मनमाड येथील कलाकार श्री साहिल साळसकर यांनी कोजागिरी पौर्णिमा निमित्त सुंदर अशी रांगोळी काढुन कोजागिरी पौर्णिमा साजरी केली.

अजून बातम्या वाचा..

खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या दक्षिण व पच्छिम विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कला...

read more
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे  आमरण उपोषण, आज हुतात्मा चौकात आत्मदहणाचा इशारा

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे आमरण उपोषण, आज हुतात्मा चौकात आत्मदहणाचा इशारा

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने...

read more
धुळे मुंबई एक्सप्रेसला  मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळे मुंबई एक्सप्रेसला मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मनमाड रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन असून या स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या...

read more
मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नाशिक - रेल्वे प्रशासनाने नव्याने आखलेल्या रेल्वे गाड्यांच्या टाईमटेबलमुळे नाशिकसह मनमाडकरांवर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]