शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे रविवार दि.२४ रोजी मनमाड दौऱ्यावर येणार आहेत, त्याअनुषंगाने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना शाखेची आढावा बैठक दि.२१ (गुरुवार) रोजी सकाळी ११ वा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मालेगाव चौफुली येथे आयोजित करण्यात आली आहे. मनमाड शहरातील सर्व शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक- नगरसेविका, युवासेना, भारतीय विदयार्थी सेना, म्यु.कामगार सेना, रेल कामगार सेना,महिला आघाडी,वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटना आदींनी बैठकीला उपस्तिथ राहण्याचे आवाहन शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केले आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












