कोरोन प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर व मनमाड नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दि.२१ पासुन स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना दुसरा डोस देय राहिल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्वरित आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहन मनमाड नगर पालिकेच्या अध्यक्षा पद्वती धात्रक, मुख्यााधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप यांनी केले आहे.
● लसीकरण केंद्र ठिकाण व वेळ :
- महात्मा गांधी विदयामंदिर, चांदवड रोड, मनमाड
- वेळ ÷ स. ९.३० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत













