loader image
[ays_poll id=7]

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा!

Oct 22, 2021

दिवाळी सण आला कि ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी आलेल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी घरी जाण्यासाठीचा उत्सव. हा उत्सव देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु यावर्षी घरी परतणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लालपरीच्या कर्मचार्यांनी संपाचा इशारा दिला आहे.

महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करा अशी मागणी करीत 17 कामगार संघटनांच्या कृती समितीने संपाची हाक देत तारीख लवकरच जाहीर करण्याची माहिती दिली आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत ‘समान काम समान दाम’ या न्यायाने वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने विभागीय कार्यालयांवर निदर्शने केली. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

कर्मचार्यांना या महिन्यापासून 28 टक्के महागाई भत्ता लागू असला तरी एसटी महामंडळाने 12 टक्यानंतर आजपर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मागणी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.