loader image
[ays_poll id=7]

लातूर जिल्हा बँक निवडणूक – भाजप प्रणीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद !

Oct 23, 2021

काँग्रेस आमदार धीरज देखमुख यांच्या प्रतिष्ठेची असलेली लातूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा प्रणीत पॅनलच्या सर्वच उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले झाल्यामुळे आमदार धीरज देखमुख पॅनलचा लढाई आधीच विजय झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, 19 संचालक निवडून देण्यासाठीची निवडणूक लागली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित 15 जागांसाठी काँग्रेसचेच 31 अर्ज शिल्लक राहिले आहेत . अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी आहे. 

काँग्रेस प्रणित पॅनलच्या दबावाखाली हे अर्ज बाद करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजपने थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज काही ना काही त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले आहेत. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अर्ज बाद करण्याचं राजकारण केलं गेलं. या विरोधात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करू असं भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी सांगितले आहे. 

विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाप्रणित पॅनल उभे करण्यात आले होते. मात्र अर्ज छाननीत या पॅनेलचा एकही अर्ज वैध ठरला नाही. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक जिंकल्याचा फक्त सोपस्कार उरला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, जळकोटचे मारोती पांडे, चाकूरचे नागनाथ पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

अजून बातम्या वाचा..

निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निकाल – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निकाल – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४०...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.  नांदगाव सोमनाथ घोंगाणे

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पटना बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन...

read more
कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार २४ तास खुले – विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार २४ तास खुले – विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्रीनिमित्त शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी त्र्यंंबकेश्वर मंदिरात सुमारे तीन लाख शिवभक्त...

read more
.