loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : २४ ऑक्टोबर २०२१

Oct 24, 2021


  1. मेष : सहकाऱ्यांना विश्वासात घ्या. संवादातून प्रश्न सोडवणे हिताचे. जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ हे धोरण अंगिकारणे फायद्याचे.
  2. वृषभ : आर्थिक नियोजन आणि कामांचे नियोजन करणे हिताचे. प्रसंगी सहकाऱ्यांची, ओळखीतल्यांची साथ घ्यावी पण सगळी ओझी एकट्याने वाहण्याची चूक करू नये हे लक्षात ठेवा. प्रसंग निभावून न्याल.
  3. मिथुन : तब्येत जपा. संवाद साधा, एकाकी राहणे टाळा. दिवस बरा जाईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.
  4. कर्क : दिवस छान आहे. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. प्रभाव पाडाल. गर्व होणार नाही याची काळजी घ्या. नकळत का होईना पण कोणालाही दुखावू नका. 
  5. सिंह : संयमाची परीक्षा बघितली जाईल. हुशारीने वागाल तर यशस्वी व्हाल. दिवस चांगला जाईल. 
  6. कन्या : शब्द, पैसा आणि वेळ जपून वापरणे आणि नियोजन करुन प्रत्येक कृती करणे हिताचे. प्रसंगी मौन राखा. संताप आवरा. दिवस बरा जाईल. 
  7. तूळ : विचारले नसताना सल्ला देणे टाळा. शब्द, पैसा आणि वेळ जपून वापरणे. आपली काळजी आपणच घेणे हिताचे. दिवस चांगला जाईल.
  8. वृश्चिक : दिवस बरा जाईल. आव्हाने सहज पेलाल. यशस्वी व्हाल.
  9. धनु : दिवस मजेत जाईल. चिंतामुक्त व्हाल. निःपक्षपाती राहणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. ओळखीतल्यांची साथ लाभेल.
  10. मकर : हुशारीने वागाल. इतरांवर प्रभाव पाडाल. यशस्वी व्हाल. 
  11. कुंभ : आत्मनिर्भर बना. कौशल्य आत्मसात करा. प्रसंगी स्वतःचे कौशल्य वापरुन इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस चांगला जाईल. 
  12. मीन : विविध मार्गांनी लाभ मिळवाल. यशस्वी व्हाल. कौतुक होईल. दिवस चांगला जाईल.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.