Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नाशिकमध्ये लवकरच भाजपला गळती लागणार – खा.संजय राऊत !

Oct 24, 2021

शिवसेना नेते खा.संजय राऊत तीन दिवस नाशिक जिल्हा दौर्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान नाशिक प्रभाग समितीच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी शनिवारी शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावत भाजपला मोठा धक्का दिला आहे. हि तर फक्त सुरुवात आहे अजूनही भाजपचे जवळपास १७ ते १८ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली असून माजी उपमहापौर प्रथमेश गितेंपाठोपाठ आता नाशिक प्रभाग समितीच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी शनिवारी शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावली आहे.  त्यामुळे भाजपमध्ये आगामी काळात मोठी पडझड पाहायला मिळते कि काय असे चित्र निर्माण झाले आहे.

महापालिकेवर परत भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. राऊत यांनी स्वत: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातले असून भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. माजी आमदार वसंत गिते, सुनील बागूल यांनी चार महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी देखील प्रवेश केला होता.

अजून बातम्या वाचा..

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमधील  छोट्या चिमुकल्यानी साजरी केली शिवजयंती

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमधील  छोट्या चिमुकल्यानी साजरी केली शिवजयंती

नांदगाव-येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील छोट्या चिमुकल्यानी विद्यालयाच्या प्रागंणात...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व बहुजन युवक संघ तर्फे शिवाजी जयंती साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व बहुजन युवक संघ तर्फे शिवाजी जयंती साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व बहुजन युवक संघ तर्फे कुळवाडी भूषण...

read more
सौ आरती दाभाडे हिच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी – व्यापारी महासंघ आणि सराफ असोसिएशन ची मागणी

सौ आरती दाभाडे हिच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी – व्यापारी महासंघ आणि सराफ असोसिएशन ची मागणी

मनमाड शहरातील सराफ व्यापारी अरुण पंडितराव सोनवणे यांची मुलगी सौ.आरती हीचा विवाह दीड महिन्यांपूर्वी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]