शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मनमाडला विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन गॅस प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इंडियन हायस्कूल येथे रोडच्या कामाचे भूमिपूजन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुतळा सुशोभिकरण कामाचे नारळ मान्यवरांच्या उपस्थितीत फोडण्यात आले. मनमाड येथील प्रसिद्ध असणाऱ्या गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेऊन गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंगजी यांच्या हस्ते खासदार संजय राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नांदगाव तालुका आमदार सुहास कांदे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मनमाड नगरपालिका नगराध्यक्षा, उप-नगराध्यक्ष, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शहरप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













