ना.भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे सोमवार दि.२५ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन व रोटरी अमरावती मिडटाऊन मेमोग्राफी यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव विधानसभा व साकोरा ग्रामपंचायतीच्या वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन सौ.विशाखाताई भुजबळ यांचे हस्ते होणार आहे.
सदर शिबिरात महिलांची मेमोग्राफी (स्तन कॅन्सर) व प्यापस्मीआर (गर्भाशय कॅन्सर) तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सदर शिबिराचा जास्तीत जास्त महिलाही फायदा घ्यावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे.











