Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार, नाशिकमध्ये पहिल्या पक्षी घराचे उद्घाटन !

Oct 26, 2021

दिवसेंदिवस मोठ्या शहरात सिमेंटची जंगले वाढत असताना पक्षांचा आवाज कमी कमी होत जात आहे, यातच नाशिक शहरात सध्या एका अभिनव उपक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे पहिले पक्षी घर नाशिक शहरात पुरीया पार्क सर्कल, दिंडोरी नाका पंचवटी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. या ६५ फुटी पक्षी घराचा उद्घाटन समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे हस्ते नुकताच पार पडला. नगरसेवक गुरमीत बग्गा यांच्या संकल्पनेतून नाशिक येथे हे पहिले पक्षी घर विकसित करण्यात आले आहे.

या अनोख्या संकल्पनेतून पक्षांच्या दाणापाण्याची सोय होणार असून रेडीमेड घरट्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. या पक्षी घरात पक्षांसाठी एकूण ८०० रेडीमेड घरटी असून सुमारे चार हजार पक्षी यात राहू शकणार आहे. सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या मदतीने या पक्षी घराची देखभाल करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की गुजरात मध्ये पक्षीघर ही संकल्पना राबवित असल्याने ठिकठिकाणी अशी पक्षीघरे पहायला मिळत आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात यावा. त्यातून पक्षांची संख्या वाढणार आहे. तसेच पर्यटन वाढीसाठी देखील हा अनोखा उपक्रम ठरणार आहे.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]