loader image
[ays_poll id=7]

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी – एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार !

Oct 26, 2021


महाराष्ट्र एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी संपाची घोषणा केली होती, थकीत वेतन व महागाई भत्ता मिळावा या मागणीवर कर्मचारी ठाम होते. यावर आता परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले व आज तातडीने निधी वितरीत देखील करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निधी वितरीत करण्यात आला आहे.

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली.

सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोरोना  काळात एसटी कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता सेवा बजावली आहे. या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेतच झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. कोरोना संकटकाळात परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठिण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले.


अजून बातम्या वाचा..

महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका : येत्या २ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश

महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका : येत्या २ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश

मुदत संपलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम येत्या २ आठवड्यात...

read more
आज औरंगाबाद मध्ये काय होणार राज गर्जना ? राज ठाकरे आणि भाजपचे टार्गेट एकच शिवसेना

आज औरंगाबाद मध्ये काय होणार राज गर्जना ? राज ठाकरे आणि भाजपचे टार्गेट एकच शिवसेना

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण ह्या मुद्द्यावरून राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापलेले...

read more
शेतकऱ्यांना रासायनिक खते रास्त दरात उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने उचलला दिलासादायक पाऊल

शेतकऱ्यांना रासायनिक खते रास्त दरात उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने उचलला दिलासादायक पाऊल

महागाईने होरपळणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलासादायक पाऊल उचलले आहे. सरकारने चालू आर्थिक...

read more
.