Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री निलमणी गणेश मंदिर तर्फे ऑनलाईन देणगी सुविधेचा प्रारंभ !

Oct 27, 2021

कोरोना महामारीमुळे ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याच अनुषंगाने मनमाड शहराचे आराध्य दैवत श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टने भक्तांसाठी ऑनलाईन देणगीची व्यवस्था केली आहे. संकष्ट चतुर्थी निमित्ताने या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. बँक ऑफ बडौदा मनमाड यांच्या सहकाऱ्याने व भक्तांच्या सुविधे व्हावी म्हणून बँक युपीआय क्यु आर कोडचा शुभारंभ करण्यात आला.

मनमाड शहराच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य सेवा, पर्यावरण, प्रदूषण मुक्ती, शैक्षणिक, क्रीडा,समाज प्रबोधन आणि विशेषतः विविध निस्वार्थ सेवा कार्यात 1997 पासून गत 25 वर्षा मध्ये मानाचे स्थान असणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टने व बँक ऑफ बडौदा मनमाड शाखा यांचे सहकार्यने धार्मिक व सेवा उपक्रमांमध्ये ऐच्छिक देणगी देणाऱ्या सर्व भक्तांच्या सुविधेसाठी ऑनलाईन देणगी साठी बँक यूपीआय क्यू आर (Bank UPI QR code) उपलब्ध करून दिला आहे. रविवार 24 ऑक्टोबर 2021 ला अश्विन कृष्ण संकष्ट चतुर्थी निमित्ताने श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त सचिव नितीन पांडे व विश्वस्त गोविंद रसाळ यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी ट्रस्ट चे अध्यक्ष किशोर गुजराथी, विश्वस्त शेखर पांगुळ ,कृष्णा शिंपी, प्रज्ञेश खांदाट, श्री निलमणी गणेश मंडळ चे भरत छबडा, अक्षय सानप,अभिषेक पितृभक्त, मच्छिंद्र साळी,सूर्यभान वडकते आदी मान्यवर सह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम...

read more
केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]