loader image
[ays_poll id=7]

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू : आ.कांदे

Oct 28, 2021

गेल्या महिनाभरात राज्यासह नाशिक जिल्हा व तालुक्याने पाण्याचा हाहाकार सहन केला, या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आपल्या तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. आता वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी वीजबिलाचे कारण पुढे करत वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला असून कंपनीने तातडीने हा प्रकार थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी आज वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला 
                      मनमाड शिवसेना कार्यालय येथे महावितरण वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत आमदार सुहास कांदे यांनी बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन व डीपी बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे. आमदार कांदे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलाची सक्तीने वसुली करू नये तसेच शेतकऱ्यांच्या डीपीचे कनेक्शन देखील कट करू नये अशी विनंती वजा इशारा दिला. अतिवृष्टीचा सर्वात जास्त पाऊस तालुक्यात झाला असून यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे त्याच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी देखील पैसे नाहीत आणि दुसरीकडे वीज बिल थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. पीक हातातून गेल्यानंतर भविष्यातील पिकांवर शेतकऱ्यांची आशा लागून आहे अशातच वेळी-अवेळी संकटांना तोंड देत शेतकरी कशीबशी शेती करत आहे. शेतकरी संकटात असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वस्थ बसू शकत नाही त्यामुळे वीज कंपनीने त्वरित वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत घेऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी सुहास कांदे यांनी दिला. येत्या काळात विज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत देण्याच्या सूचनाही आमदार कांदे यांनी  दिल्या.
यावेळी वीज वितरण कंपनीचे एस ए तडवी, संदीप शिंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी तसेच जेष्ठ नेते अल्ताफ खान, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख मयुर बोरसे, गुलाब भाबड, मुन्ना दरगुडे, दिनेश केकान, नगरसेवक लियाकत शेख सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
.