Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माजी खा.ईश्‍वरबाबुजी जैन यांची अशोका बिल्डर्स विरोधात फिर्याद : आरोप बिनबुडाचे अशोका बिल्डर्सचा खुलासा !

Oct 29, 2021

उसनवारीने घेतलेले पैसे परत केले नाही, मुदतीची मागणी करुन पैसे देण्यास टाळाटाळ केली तसेच वादग्रस्त जमिनीची माहिती लपवून ठेवत त्याबाबत करारानामा करण्यास भाग पाडून नाशिक येथील अशोका बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक येथील अशोका बिल्डर्सचे मालक अशोक कटारिया यांच्यासह पाच जणांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात ११ कोटी रुपये व १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हातउसनवारीने घेतले. त्यातील काही रक्कम या लोकांनी जैन यांना परत केली. उर्वरित ६ कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ व १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० अशी एकूण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ परत मागण्यासाठी तगादा लावला असता त्यांनी मुदतीची मागणी करुन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर राजेंद्र बुरड व स्नेहल पारख यांनी ६ कोटी ९९ लाख ७४१ रुपये देण्यास मुदत मागून जॉईंट व्हेंचर अग्रीमेंट तयार करु असे सांगून काही दस्ताऐवज आणले. हे दस्ताऐवज रक्कम परत करण्यास मुदतवाढीचे होते. त्यानंतर १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० च्या थकबाकीपोटी देखील संयुक्त करारनामा तयार करुन आणला.

या सर्व लोकांवर विश्वास ठेऊन या करारावर आपण सह्या केल्या, असे जैन यांनी नमूद केले आहे.मानराज मोटर्सच्या नावानेही करार याच काळात मानराज मोटर्स कंपनीला २५ कोटी रुपये तात्काळ देणे असल्याने जैन यांनी रक्कम परत करण्याबाबत पुन्हा या लोकांकडे तगादा लावला. ही संधी साधून दोन्ही जॉईंट व्हेंचर ग्रीमेंटच्या बदल्यात तिसरा पक्ष म्हणून मानराज मोटर्सचे संचालक अशोक बेदमुथा यांना व्यवहारात आणून ३ मार्च २०१७ रोजी डीड ऑफ असाईनमेंट दस्ताऐवज या पाच जणांना बनवून आणले. आपल्या व्यवहारापोटी कटारिया हे परस्पर मानराज मोटर्सला देण्यास तयार असल्याने या करारावर जैन यांनी सही केली. त्यानंतर देखील सहा महिन्याच्या तोंडी मुदतीत रक्कम परत केली नाही. आडगाव, ता.नाशिक, विहिगाव, ता.शरणपूर, जि.ठाणे, सिन्नर व सातपूर येथील जमिनीच्याबाबत करार झालेला होता. यातील काही वाद न्यायालयात आहेत. सिन्नरची जमीन केंद्र सरकारने संपादित केलेली आहे, ही बाब देखील कराराच्यावेळी लपवून ठेवल्याचे जैन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

जैन यांचे आरोप बिनबुडाचे : अशोका बिल्डर्सचा खुलासा !

अशोका ग्रुप हा नेहमी कायदेशीर व पारदर्शक व्यवहार करीत असतो. सदर केस अगोदरच न्यायालयातून रद्दबातल करण्यात आलेली आहे. उलट या केस मध्ये आमचीच फसवणूक झालेली आहे. यापुर्वी प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यांनुसार माजी खासदार ईश्वरलाल जैन हे आर्थिक अडचणीत असल्याचे दिसून येत होते. अनेक बँकांनी त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावल्याचे वृत्त आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर भरवसा आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, हा पूर्ण विश्वास आहे. आमच्या चारित्र्यहननाच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे अशोका ग्रुपच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

अजून बातम्या वाचा..

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

  सौ.अंजुमताई कांदे यांची "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस...

read more
भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...

read more
जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

नांदगांव : मारुती जगधने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष...

read more
बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या  मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]